शासनाकडून गाळ उपशासाठी मदतीची अपेक्षा


शेतकऱ्यांकडून दुष्काळात स्वखर्चाने गाळ उपसा

दररोज ६०० ट्रॅक्टर व ६० ते ६५ टिप्परने गाळाची केली जातेय वाहतूक

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणातून परिसरातील शेतकरी स्वखर्चाने सध्या मोठ्या प्रमाणावर धरणातील गाळ घेऊन जात आहे. <span;>दररोज ६०० ट्रॅक्टर व ६० ते ६५ टिप्परने गाळलेला जात असल्याने दोनशे ते अडीचशे ब्रास दररोज गाळाची वाहतूक होत असल्याची दिसून येते. एकूणच शासनाने दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना गाळ काढण्यासाठी वाहतूक खर्च व पोकलँड द्यावे अशी मागणी होत आहे.
भोकरदन तालुक्यातील दानापूरचे जुई धरणातून गाळ काढण्यासाठी शेतकरी आघाडीवर आहेत, मात्र शासनाकडून कोणतेही उपायोजना केली जात नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. तलावातून शेतकरी स्वःखर्चाने गाळ उपसा करून शेतात नेऊन टाकत आहेत.
भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरण पूर्णपणे कोरडे पडले आहे. त्यामुळे या धरणातील सुपीक गाळ शेतकरी एक नोव्हेंबरपासून मोठ्या प्रमाणात शेतात टाकण्यासाठी काढून येत आहेत. या सुपीक गाळामुळे शेतीसाठी उपयुक्त असून, उत्पन्न वाढीसाठी फायदेशीर असल्याचे शेतकरी सांगत आहेत. जुई धरण परिसरातील आणि तालुक्याचे इतर काही भागातील दूरवरचे शेतकरी देखील शेतीसाठी वरदान असलेला धरणातील गाळ नेण्यासाठी दुष्काळ का होईना संधी मिळाली म्हणून खर्च करीत आहे. दहा ते बारा किलोमीटरपर्यंत शेतकरी शेतात गाळ नेतांना दिसून येत आहेत. यावर्षी जुई धरणात पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असून, उत्पन्नात घट आली आहे.
सध्या शंभर टक्के धरण कोरडे झालेले असून धरणातील गाळ नेण्यास शेतकरी प्राधान्य देत आहेत. या गाळामुळे कित्येक वर्षांपर्यंत उत्पन्न चांगले निघते असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार धरणातून सुमारे ७० हजार ब्रास योजने अंतर्गत २०१८-१९ मध्ये गाळ काढण्यात आला होता. आज रोजी शासनाकडून कोणतेच पाऊल उचलले गेलेले नसल्याने शेतकरी वर्ग स्वतःहून गाळ काढत आहेत. तसेच कोणत्याही सामाजिक संस्थेने देखील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांची अडचण बघून पोकलेन अथवा जेसीबी पाठवलेले नाही. सध्या या धरणातून गाळ भरून घेण्यासाठी सुमारे असंख्य जेसीबी, पाच ते सहा पोकलेन, ६०० च्यावर ट्रॅक्टर, ६०/६५ हायवांद्वारे गाळ उपसा करून वाहतूक केली जात आहे.
दानापूरसह देहेड, रेणुकाई पिंपळगाव, वरुड, रेलगाव, भंडारगड, सुरंगळी, मुरतळ, मुर्तडवाडी, कठोर बाजार, कल्याणी, करजगाव, कोठाकोळी, दगडवाडी, मनापूर, मलकापूर, भिवपूर, भोकरदन, तळणी, भायडी, विरेगाव, सिपोरा बाजार, चोऱ्हाळा, लिंगेवाडी, बाभूळगाव, बोरगाव, गोदरी, वडशेद, निंबोळा, ताडकळस, वाडी, या व अन्य भागातील शेतकरी गाळ उपसा करून नेत आहेत.

Advertisement

चौकट : भोकरदन तालुक्यातील महत्त्वाची जुई धरण सध्या कोरडेठाक पडल्याने भोकरदन शहरासह अन्य काही गावात पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहे. शेतकरी देखील खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम वाया गेल्याने अडचणीत आहेत. दुष्काळ जाहीर झाला मात्र सवलती अजून आल्या नाहीत अशा परिस्थितीत पुढचे नियोजन म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चातून धरणातील गाळ नेण्यास सुरुवात केली आहे. या मागच्या दोन महिन्यात हजारो ब्रास गाळ उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने भविष्यातील पाण्याची नियोजन आणि गाळ उपसा करून दिल्या दिल्यानंतर शेतकऱ्यांचा होणारा फायदा लक्षात घेऊन शासनाने तातडीने शेतकऱ्यांना गाळपश्यासाठी मदत करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »