शासकीय विश्रामगृह व निवासस्थानांची दुर्दशा
अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
भोकरदन : भोकरदन शहरातील शासकीय विश्रामगृहासह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुर्दशा झाली आहे. याकडे शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी होत आहे. भोकरदन शहरातील या शासकीय विश्रामगृहाला पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी शहरातील काही युवा कार्यकर्ते पाठपुरावा आहे.
भोकरदन येथे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच आ. संतोष दानवे यांचे निवासस्थान असल्याने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची येथे वर्दळ असते. साधारणता दोन वर्षांपूर्वी या विश्रामगृहाची चांगली स्थिती होती. विश्रामगृहाच्या मागील बाजूस असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात काही कर्मचारी राहत असल्याने हा परिसर एकदम स्वच्छ आणि रमनीय होता. मात्र दोन-तीन वर्षांच्या कार्यकाळात या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताच अधिकारी आणि कर्मचारी राहत नसल्याने शासकीय विश्रामगृह व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची अत्यंत दयनीय अवस्था झाली<span;>आहे. भोकरदन शहर पूर्वीपासून राजकीय व भौगोलिक, व्यापारीदृष्ट्या, आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. सध्याचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे हे देखील भोकरदन शहरातच राहतात. आणि विशेष म्हणजे शासकीय विश्रामगृहाच्या काही अंतरावरच त्यांचे निवासस्थान आहे. दानवे यांच्याकडे कामानिमित्त अनेक वरिष्ठ अधिकारी व नेत्यांची कायम वर्दळ असते. अशावेळी त्यांना बसण्यासाठी देखील चांगली शासकीय जागा नसल्याने बाहेरून येणारे अधिकारी व राजकीय नेते नवल व्यक्त करीत आहे. भोकरदन शहरात किंबहुना अनेकदा रात्रीच्या वेळी विश्रामगृहाची व्यवस्था नसल्याने त्यांना इतर ठिकाणी मुक्कामासाठी जावे लागते ही शोकांतिका आहे. तसेच या ठिकाणी अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालये, पोलिस ठाणे, शाळा महाविद्यालये आदी कार्यालये आहेत त्यामुळे अनेकदा शासकीय कामासाठी आलेला कर्मचारी अधिकारी यांना मुक्कामासाठी तालुक्याचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्ह्यातील लोकांचा दैनंदिन कामासाठी भोकरदन येथे वावर असल्याची ही बाब लक्षात घेऊन राजकीय व्यक्ती व बाहेरून येणाऱ्या अधिकारी यांच्या सोयीसाठी जालना मुख्य रस्त्यावर भव्य परिसरात सर्व सोयींनी उपलब्ध असे शासकीय विश्रामगृह लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले आहे. शासकीय विश्रामगृहाची दुरुस्ती करून या ठिकाणी परत पू- र्वीसारखे सुख सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होत आहे.
केंद्रीय राज्यमंत्री दानवे व आमदार दानवे यांनी शासकीय विश्रामगृहाच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. सध्या भोकरदन जालना
रस्त्याच्या कामामुळे शासकीय विश्रामगृहाची संरक्षक भिंत पाडण्यात आली आहे. त्यामुळे तर आणखीनच या विश्रामगृहाचे हाल झाल्याचे दिसत आहे. भोकरदन शहरातील हे एकमेव विश्रामगृह सोडले तर एखाद्या अति महत्त्वाचे अधिकारी किंवा नेत्यासाठी सर्व सोयीने उपलब्ध असे खासगी लॉजिंगदेखील नसल्याने व्हीआयपीचे मोठे हाल होत आहे.