केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने
जालना शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेसाठी महाराष्ट्र शासनाकासून ७२.८९ कोटी रुपयांचा निधीस तत्वता मान्यता प्रदान
जालना : जालना शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेसाठी भाजपा नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून ७२.८९ कोटी रुपयांचा निधीस महाराष्ट्र शासनाकडून तत्वता मान्यता प्रदान करण्यात आली आहे. ना. दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्यासोबत मंत्रालयात वारंवार बैठका घेऊन जालना शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करून घेतला आहे.
जालना शहरात सध्याच्या परिस्थितीत पाणीपुरवठा करण्यासाठी घाणेवाडी जलाशयातून निजामकालीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत, ती अत्यंत जीर्ण झाली आहे तसेच जायकवाडी धरणातून नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली पंरतु सदर योजनेमध्ये क्षमतेप्रमाणे जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने पूर्ण क्षमतेने या योजनेतून पाणीपुरवठा होणे शक्य नव्हते, पाणीपुरवठा योजनेची क्षमता ५४ एम.एल.डी. असताना अंबड येथे फक्त २४ एम.एल.डी. क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आल्याने पाणीपुरवठा योजनेचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही, यामुळे जालना शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून शहराला सुमारे १० दिवसाला पाणीपुरवठा होत असल्याने या निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नाकडे ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी जातीने लक्ष घातले, जालना शहरास जालना शहरातील लोकसंख्याचा विचार केला असता जालना शहराला रोज किमान ६० एम.एल.डी. पाणीपुरवठ्याची गरज आहे, यासाठी अंबड येथे अतिरिक्त ३५ एम.एल.डी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याची आवश्यकता आहे. तसेच जायकवाडी जलाशयातून पाणीपुरवठा करणारी निजामकालीन योजनेत सुधारणा करणे देखील अत्यंत गरजेचे आहे. या योजनेतून नवीन पाईपलाईन टाकल्यास शहरास गुरुत्वाकर्षण बलाद्वारे दररोज १५ एम.एल.डी. पाणीपुरवठा करणे शक्य आहे. यामुळे ना.दानवे यांनी जालना शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी जिल्हाधिकारी जालना व जालना महानगरपालिका आयुक्त यांच्या सोबत बैठक घेऊन पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार केला व जिल्हाधिकारी जालना व महानगरपालिका जालना शहर आयुक्त यांच्यासह मंत्रालय मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार तसेच नगर विकास व अर्थ विभागाच्या संबंधित सचिवाशी बैठका घेतल्या या बैठकीत जालना शहराच्या सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेसाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान अंतर्गत सुमारे ७२.८९ कोटी रुपये कामांना मंजुरी देणे बाबत चर्चा झाली.
या सुधारित आराखड्यामध्ये घाणेवाडी तलाव ते १५ एम.एल.डी. जलशुद्धीकरण केंद्र पर्यंत ७०० मि.मी. डी.आय.के ७ नवीन पाईपलाईन टाकणेसाठी रु. 2038.51 लक्ष, जेईएस कॉलेज जवळ 15 एम.एल.डी. जलशुद्धीकरण केंद्र बांधणे (घाणेवाडी तलाव उदभव) साठी 544.97 लक्ष, अंबड येथे 35 एम.एल.डी जलशुद्धीकरण केंद्र बांधणे (जायकवाडी धरण उदभव) साठी 954.77 लक्ष, अस्तित्वातील व प्रस्तावित अंबड येथे ९०० एम.एल.डी डी.आय K-9 पंप जोडणे साठी 142.98 लक्ष, अंबड जलशुद्धीकरण केंद्र येथे संरक्षण भिंत बांधणे साठी 204.94, इंदेवाडी येथे 22 लक्ष लिटरचा जलकुंभ (एम.बी.आर) बांधणे साठी 216.25 लक्ष, जुन्या एम.बी.आर. चे बळकटीकरण करण्यासाठी ४७.८८ लक्ष, इंदेवाडी टाकी ते मंगळबाजार टाकी पर्यंत 600 आणि ५०० मि.मी. डी.आय.के ७ नवीन पाईपलाईन टाकणेसाठी 1093.03 लक्ष, घाणेवाडी येथे रॉ-वाटर पंपिंग मशिनरी साठी 33.37 लक्ष, १५ एम.एल.डी जलशुद्धीकरण केंद्रावर शुद्ध पाणी पंपिंग मशिनरी साठी १५५.७२ लक्ष, जायकवाडी येथे रॉ-वाटर पंपिंग मशिनरी साठी 280.95 लक्ष, ३५ एम.एल.डी जलशुद्धीकरण केंद्रावर ७५ KWP क्षमतेचा मायक्रो हायड्रो पॉवर प्लांट बसविनेसाठी 15०.57 लक्ष या सह अंदाजपत्रके किमतीत वस्तू व सेवा कराचा समावेश होऊन प्रस्ताव सुमारे ७२.८९ कोटी रुपयांचा तयार करण्यात आला.
: सदर जालना शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेसाठी ७२.८९ कोटी रुपयांच्या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाने तत्वता मंजुरी दिली व जालना शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढल्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना जिल्ह्यातील जनतेच्या वतीने अभिनंदन व जाहीर आभार व्यक्त केले आहे.