शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये दुष्काळी अनुदान द्या
भोकरदन शहराला खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी तात्काळ सुरू करा या मागणीसाठी एसडीएम कार्यालयावर मोर्चा
भोकरदन : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करा व भोकरदन शहराला खडकपूर्णा धरणातून तातडीने पाणीपुरवठा करा या मागणीसाठी नागरिक व शेतकऱ्यांच्या वतीने सोमवारी एसडीएम कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बहुतेक संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
भोकरदन – जाफ्राबाद तालुक्यातील नागरिकांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला होता. भिषण दुष्काळी परिस्थितीवर तात्काळ उपायोजना करण्या बाबत प्रशासनाला व शासनाला मागण्याचे निवेदन देण्यात आले.
भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील अनेक गावामध्ये तसेच शहरामध्ये पाणीटंचाई आहे.गुरांचा चाऱ्याचा प्रश्न बिकट होत आहे. मजुरांच्या हाताला काम नाही. ही परिस्थिती दिवसें दिवस भीषण होत जाणार आहे तरी या परिस्थितीवर तात्काळ योग्य उपाय योजना करण्यात यावी. तसेच शासनाच्या दुष्काळा बाबत काढलेल्या जी.आर.ची अंमलबजावणी त्वरीत सुरु करावी.पीक वीमा रक्कम त्वरित देण्याची कार्यवाही करण्यात यावी आणि दुष्काळी अनुदान हेक्टरी 50 हजार रुपये देऊन चारा छावण्या सुरु करण्यात याव्यात. केवायसी करण्यात तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे दुष्काळी अनुदान व संजय गांधी निराधार साठी अनुदान इतर योजनांचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांना मिळत नाही त्यावर तात्काळ उपाययोजना करून संबंधितांना अनुदान देण्यात यावे. खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी भोकरदन जवळ आलेले आहे. तात्काळ युद्ध पातळीवर प्रयत्न करून भोकरदन शहराला पाणीपुरवठा करण्यात यावा.
यापूर्वी दिलेल्या निवेदनाला कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे आज सर्व नागरिकांच्या वतीने दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी के.व्ही.बोरसे ( गुरुजी ), काकासाहेब साबळे, अंगद पाटील सहाने, जनार्दन पाटील सोळुंके, बाबर चांद शेख, मदनराव तुपे, महेश पुरोहित, सय्यद आरिफ, प्रकाश तळेकर, राजेंद्र लोखंडे, संजय दांडगे, विठ्ठल पवार, राहुल देशमुख, शेख फशी, दीपक वेलदोडे फिरोज खान, महेश औटी, रिजवान शेख, शफिक खान मैजात खान, आनंदा कानडे, गंजीधर लोखंडे, यांच्यासह अनेक नागरिक व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.