मराठ्यांच्या पोरांवर अन्याय झाला तर, सरकारला किंमत मोजावी लागेल – मनोज जरांगे पाटील


भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते येथे विराट सभा

भोकरदन : राज्य शासनाने कोणाच्याही दबावाला बळी न पडता सरळ सरळ २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे. आमच्या सोबत गनिमीकावा आणि दगाफटका करून मराठ्यांच्या पोरांवर अन्याय केला तर सरकारला त्याची किंमत मोजावी लागणार आहे. शेवटी गाठ माझ्याशी आहे असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पिंपळगाव कोलते येथील विराट सभेत दिला.

पिंपळगाव कोलते येथे शनिवारी सायंकाळी मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा झाली. आता कुणबी नोंदीही सापडल्या आहेत. त्यांनाही आरक्षण मिळाले आहे. यामुळे शासनाने आता उर्वरित गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ३३ व ३४ नोंदीनुसार ओबीसीतून आरक्षण द्यावे.
राज्य सरकारने २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण न दिल्यास १७ डिसेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक घेणार आहे. सरकारने दगाफटका केल्यास मराठा समाज बांधवांसह प्रसंगी मुंबईवर धडक मारू, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Advertisement

ते म्हणाले की, आम्ही आओबीसीतूनच आरक्षण घेणार. आम्ही दंड आणि मांड्या थोपटल्या आहेत. आता सरकारला सुट्टी नाही. आरक्षण दिले नाही तर गाठ मराठ्यांशी आहे. राज्य सरकारने कुणा एकट्याच्या दबावाखाली येऊन मराठ्यांशी दगाफकटा करू नये. ७० वर्षांपासून आमच्यावर अन्याय होत आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना २४ डिसेंबरपर्यंची वेळ आहे. ओबीसी आरक्षणाचा फक्त एका जातीला फायदा झाला आहे. २००९ ते २०१४ या काळात ८० टक्के हिस्सा एकट्याने खाल्ला. इतर ३०० जातींना २० टक्के हिस्सा मिळाला. भुजबळांना फक्त सभेला धनगर समाज लागतो. मात्र धनगर समाजासाठी आरक्षणाची भूमिका ते जाहीर करीत नाहीत, अशी असे म्हणून त्यांनी छगन भुजबळ यांच्या जोरदार टीकास्त्र सोडले
भुजबळांबाबत बोलताना जरांगे म्हणाले, की ते  भारतातला सर्वात कलंक लागलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ आहे. जाती-जातीत तेढ निर्माण करणारा, ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये दंगली घडवण्याचे काम करणारा, सगळ्यात वाया गेलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ, अशी घणाघाती टीकाही जरांगे यांनी केली.

: पिंपळगाव कोलते आणि परिसरातील समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांचे गावात ठिकठिकाणी स्वागत केले. सभास्थळी जाईपर्यंत दोन किलोमीटर अंतरावर विविध संघटनांकडून जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तब्बल दोन ते तीन किलोमीटर पर्यंत रॅली काढण्यात आली होती.

: छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्यांनी समाज बांधवांशी संवाद साधला. दुपारी १२ वाजता सुरु होणारी सभा सायंकाळी ६ वाजता सुरु झाली तरी देखील सभेला प्रचंड गर्दी होती आणि उत्साह देखील कायम होता. यावेळी असंख्य महिला, पुरुषांसह युवकांनी सभास्थळी गर्दी केली होती. तर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »