पीएम विश्वकर्मा ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवणार
विश्वकर्मा योजना समितीचे जिल्हाप्रमुख परिहार यांची माहिती
भोकरदन : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून १७ सप्टेंबर २०२३ रोजी विश्वकर्मा यांच्या जयंतीच्या औचित साधून देशातील नाही, धोबी, चर्मकार, सुतार<span;>लोहार, कुंभार, शिल्पकार, सोनार, १८ पगड जातीत तथा बुलेतेदार घटकांसाठी पीएम विश्वकर्मा कर्ज योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना विश्वकर्मा तळागाळातील न घटकापर्यंत पोहोचविणार असून या योजनेच्या या घटकातील जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घ्यावा असे आवाहन विश्वकर्मा योजना समितीचे जिल्हाप्रमुख तथा भोकरदन येथील रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विजयसिंह परिहार यांनी केले आहे.
ही योजना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, भास्कर दानवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात राबवली जात आहे. या योजनेचा संदर्भात नुकतीच मुंबई येथे बैठक होऊन नांदेडलाही पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न झाली आहे.
१२ बलुतेदार व सूक्ष्म जाती जमातीतील कलावंत तथा समाज बांधव आजही पारंपारिक व्यवसाय करीत आहे.
म्हणून त्यांना उभारी देण्यासाठी व पारंपारिक कला त्रिकला टिकावी यासाठी त्यांना आपल्या व्यवसायाचे उच्च प्रतीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे व त्या कारागिराला आपापल्या व्यवसायाचे टूल किट देण्यात येणार असल्याची माहिती परिहार यांनी दिली.
देशाचे प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी यांनी गावातील बलुतेदारांना त्यांच्या श्रमाचे योग्य मूल्य मिळावे, त्यांचे कौशल्य आणखी वाढावे, यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. कारागिरांच्या विकासासाठी ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. देशातील बेरोजगारी कमी करणे आणि गरीब कारागिरांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय उभारण्यास मदत करेल. या योजनेत लोकांना केवळ कर्जच मिळणार नाही तर कौशल्य प्रशिक्षणही मिळणार आहे.
: सुतार, होड्या बनवणारे, हत्यारे बनवणारे, लोहार, टाळा बनवणारे, हातोडा आणि टूलकिट बनविणारे, सोनार, कुंभार, मूर्तीकार, चांभार, मेस्त्री, चटई आणि झाडू बनवणारे, पारंपारिक बाहुल्या आणि खेळणी बनविणारे, न्हावी, हार बनविणारे, धोबी, शिंपी, माशाचे जाळे अशा १८ पारंपरिक कामांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
: खेड्यापाड्यातील कारागिरांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊन आपले कौशल्य विकसित करावे. आपले जीवनमान उंचावून कौशल्य विकसित करावे. जिल्ह्यातून मोठ्या संख्येने विश्वकर्मा कारागीर निर्माण व्हावे, यासाठी जास्तीत जास्त कारागिरांनी सामूहिक सुविधा केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन
– विजय नाना परिहार, ( विश्वकर्मा योजना समितीचे जिल्हाप्रमुख )