बांधकाम कामगारांना २३ लाखांचे अनुदान वाटप
आ. संतोष दानवे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण
भोकरदन : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील लाभार्थ्यांना विविध योजनेतून २३ लाख १३ हजार रुपयांच्या अनुदान मंजूर झाले आहे. सदर अनुदान वाटपास सुरुवात झाली आहे. भोकरदन येथे नुकतेच आ. संतोष दानवे यांच्या हस्ते १६ कामगारांना ११ लाख ३१ हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रदान केला जातो. परंतु सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगार कल्याण मंडळाकडे रितसर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असते. ग्रामीण भागातील कामगारांना ऑनलाईन नोंदणीचे ज्ञान नसल्यामुळे ग्रामीण भागातील कामगार विविध कल्याणकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहत होते. हे लक्षात घेवुन आ. संतोष दानवे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कामगार आघाडी तालुका भोकरदन यांच्या माध्यमातून भोकरदन येथे कामगारांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी प्रशिक्षीत कर्मचाऱ्यासह सुसज्ज कार्यालयाची स्थापना करून कामगार नोंदणीची सुरुवात केली होती. त्याचा प्रत्यक्ष लाभ आता कामगारांना मिळण्यास प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत भाजपा कामगार कार्यालयाच्या वतीने भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील तब्बल ७७६५ कामगारांना प्रत्यक्ष ५ हजार रुपये व सुरक्षा संचचे वाटप करण्यात आले. नुकताच भोकरदन येथील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील १६ कामगारांना प्रातिनिधिक स्वरुपात विविध योजने अंतर्गत ११ लक्ष ३१ हजार रुपयांच्या धनादेशांचे वाटप आ. दानवे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष गणेश ठाले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यांना मिळाला लाभ कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आ. संतोष पा. दानवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यामध्ये शांताबाई रावसाहेब बरडे (रा. फत्तेपूर), जगन हरिभाऊ हिवाळे (रा. शिराळा) संतोष बाबुराव रोकडे (रा.खापरखेडा) शिवाजी भिमराव सरोदे, जगन तेजराव वरगणे, कल्पना गजानन तेलंग्रे (रा. सावंगी अ.राव), वैशाली चंद्रकांत जाधव (रा. वालसा खा.) संजय भिमराव सहाणे (रा. कोपर्डा) जयाजी साहेबराव मोरे (रा. क्षिरसागर) पंडीत आसाराम राऊत (रा.कोपर्डा) यमुना उत्तम मव्हारे (रा. क्षिरसागर) बाबुराव दौलत तेलंग्रे (रा.वालसा वडाळा) ज्ञानेश्वर रुस्तुम जाधव (रा. वरुड), गजानन कडुबा वाघमारे (रा. मलकापूर), शिवाजी तुकाराम पाबळे (रा. कोपर्डा) गजानन तुकाराम पाबळे (रा. कोपर्डा), रमेश त्रिंबक गायकवाड (रा. पद्मावती) चंद्रकलाबाई राजू सपकाळ (रा. पद्मावती) द्रौपदा नारायण घोडके (रा. मालखेडा) सुनिता भगवान बारोटे (रा.शेलूद), प्रमोद सोनुने (रा. भोरखेडा), राजेंद्र विठ्ठलराव गाढे (रा.बाभुळगांव) अशोक लोखंडे, (बरांजळा लो.)<span;>पोपटराव रुस्तुम बदर (रा.वालसा खा.) मंगल अरुण साबळे (रा.नांजा) कचरु रामराव विरे (रा. लिंगेवाडी) गणपत विठ्ठल मोरे, नारायण पाबळे, नारायण सहाने (रा. सिरसगांव म.) रत्नाबाई गजानन तळेकर (रा.भोकरदन) कडुबा तुकाराम गाढे (रा. वरुड) पांडुरंग पिराजी गोफणे (रा. टेंभुर्णी) गुलाबराव गोविंदराव दळवी (रा. येवता) ज्ञानेश्वर तेजराव घोडके (रा.जवखेडा ठेंग) भाऊसाहेब हिम्मतराव सहाने (रा. सिरसगाव मं.), रतन पंडीत मव्हारे (रा. क्षिरसागर) नंदकिशोर आत्माराम खडके, गणपत विठ्ठल मोरे, गापीनाथ मोरे (रा. नांजा) वैभव भोपळे (रा. हनुमंतखेडा), सारंगधर गंभिरराव विरे (रा. लिंगेवाडी) अजय पंढरीनाथ शिवरकर (रा. वालसावंगी) किशोर साहेबराव दुतोंडे (रा.शेलुद) कपीला रामदास बोरमाळे (रा. वालसावंगी) आदी लाभार्थ्यांना कामगार कल्याण योजनेच्या विविध योजनांचा लाभ मिळाला आहे.