भोकरदन येथे भील समाजबांधवाचे आमरण उपोषण
मराठा सेवकांचा भील समाजबांधवांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा
भोकरदन: भोकरदन-जाफराबाद तालुक्यातील आदिवाशी भील समाजबांधवाचे संपुर्ण कागदपत्रे असतांना उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडुन जात प्रमाणपत्र देत नसल्याने युवकांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे. या उपोषणाला मराठा सेवकांनी पाठींबा दिला आहे.
भोकरदन-जाफ्राबाद तालुक्यातील आदिवासी समुदायापैकी भील बांधवांचे प्रलंबीत २०० जात प्रमाणपत्र उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मिळेपर्यंत भोकरदन येथे चालु असलेल्या आमरण उपोषणाला पाठींबा देण्यासाठी भोकरदन तालुक्यातील मराठा सेवक विकास जाधव, सचिन फटाले, सुरज मव्हारे तसेच कलीम बापू काझी यांनी भेट दिली. त्या वेळी विकास जाधव यांनी भील बांधवांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आम्ही त्यांच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. भील समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य करुन भील बांधवांना न्याय मिळावा; म्हणून आम्ही प्रयत्न करू आरक्षणात असून आरक्षणाचा लाभ मिळत नाही केवळ सर्टिफिकीट मुळे अनेक कारणे देवून गरीबाना सर्टफिकीट दिले जातं नाही, अनेक प्रमाणत दलाल – अधिकारी पैशाची मागणी करतात ही फार मोठी शोकांतिका आहे. आज मराठा समाज ही आरक्षणाची लढाई लढतोय सर्व जातीचा पाठींबा मराठा समाजाला मिळत असताना सर्व जातीचा मोठा भाऊ म्हूणन कर्तव्य म्हणून भावाच्या हक्काने आम्ही त्याच्या ही लढ्यात सहभागी आहोत असे सांगितले.