सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा


तळेगाव-दाभाडे-तळेगाव दाभाडे येथील मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित, (Talegaon Dabhade) सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमीत्त शनिवारी (दि.14) वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रंथ दिंडीचे सकाळी साडे आठ वाजता ग्रंथ दिंडीचे महाविद्यालयातून प्रस्थान झाले. महाविद्यालयापासून तळेगाव येथील सर्वात जुने वाचनालय श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालयात ग्रंथदिंडी नेण्यात आली. यादरम्यान नागरिकांकडून ग्रंथ संकलन देखील केले गेले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीहरी मिसाळ यांनी दिंडीचे पूजन केले. यावेळी संस्थेचे सहसचिव प्रा. वसंत पवार यावेळी उपस्थित होते.

पालखीमध्ये ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, आपले संविधान (Pune) , डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलम यांचे अग्निपंख आणि अन्य पुस्तके ठेवण्यात आली होती. ढोल ताशांच्या गजरात, अतिशय उत्साहात महाविद्यालयातील 120 विद्यार्थिनी श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालयात पोहोचल्या.

Advertisement

तिथे ग्रंथपाल विनया अत्रे, मानसी गुळूमकर व अन्य महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते दिंडीचे औक्षण करण्यात आले. ग्रंथालय भेटीनंतर वाचनालयाच्या अभ्यासिकेत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष यतीन शहा, विक्रम दाभाडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशांत दिवेकर यांनी आपल्या भाषणातून डॉ. कलाम यांचे अतिशय मौल्यवान विचार सांगितले. महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनाली पुकळे हिने मनोगत व्यक्त केले. वाचनालयाच्या अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
प्रा. सोमनाथ कसबे, प्रा. डॉ. विनया केसकर, ग्रंथपाल रोहिणी टाकसाळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. माधवी शेटे, प्रा. स्वाती पाटील, प्रा. श्रुतिका झोडगे, प्रा. डॉ. हेमंत मुजळगेकर, प्रा. डॉ. प्रतिक सासणे, प्रा. चंदन सोनाळे उपस्थित होते.
प्रा. साबेरा शेख, प्रा. डॉ. माधुरी चंदनशिव, प्रा. शिल्पा वाजे आणि प्रध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी दिंडीच्या संयोजनात सहकार्य केले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त 14 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या दरम्यान “ग्रंथ दान सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. आपल्याकडे असलेल्या चांगल्या स्थितीतील ग्रंथांचा इतरांना वाचनासाठी लाभ मिळावा या शुद्ध हेतूने नागरिकांनी आपल्याकडे असलेले व आपण वाचलेले ग्रंथ, पुस्तके आदर्श विद्यामंदिर संकुलात, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या ग्रंथालयात दान करावेत. असे आवाहन ग्रंथपाल टाकसाळे यांनी यावेळी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »