मॉर्निग वॉककडे नागरिकांचा कल वाढला
भोकरदन : शहरीकरणामुळे होणारी दगदग, शारीरिक आणि मानसिक ताण, ताण-तणाव हवा आणि ध्वनी प्रदूषण याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. नियमित व्यायामाने आपल्या आरोग्य आणि शारीरिक स्वास्थ्य टिकवता येतं. नियमित आणि सातत्याने केलेल्या व्यायामामुळे अनेक छोटे आजार टाळता येतात. उतारवयात पूर्वी केलेल्या व्यायामामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य तंदुरुस्त आणि टिकून ठेवता येत. सध्या थंडी चांगली जाणवत आहे. तरुण तरुणी महिला आणि वयोवृद्ध रोज मॉर्निंग वॉक, जॉगिंग आणि जिमला जानारांची गर्दि पहाटे आणि सायंकाळी दिसू लागली आहे.
परंपरागत व्यायाम शाळा आणि तालमींची ची जागा आणि महत्त्व काही मोजक्याचं गावांतून दिसते आहे. तालमी कमी होत चालल्या असून त्याची जागा अत्याधुनिक व्यायामाच्या साहित्याने आणि वातानुकूलित जिम ने घेतली आहे. झोंबाझोंबी करून कुस्तीच्या हौदातील माती अंगाला लागण्याचे प्रकार आता कमी होत चालले आहेत. पारंपारिक व्यायाम प्रकारातील दंड, सिंगलबार डबलबार जोर बैठक, मल्लखांब, दोरी मल्लखांब, मुदगल फिरवणे, आदी शब्द आणि नावे आता फार कमी ऐकण्यात बोलण्यात येत आहेत.
घरच्या घरी केले जाणारे योगासने, प्राणायाम, दीर्घ श्वसन, आदी प्रकार न करता काही सुखवस्तू मंडळी जिम कडे वळत आहे. वयाच्या चाळीशी च्या नंतर ‘होल बॉडी चेकअप’ करण्यासाठी केले जाणारे आव्हान दिले जाणारे पॅकेज ऑफर्स आणि यातून निदर्शनास आलेले छोटे-मोठे इतर आजार यामुळे भितीपोटी का होईना हिवाळा ऋतूत सकाळी व्यायामास आणि फिरावयास जाणाऱ्यांची संख्या वाढते आहे. व्यायाम शाळेच्या जागी नवा आधुनिक जिम हा प्रकार शहरी भागांत सुरू झालाआहे. शहरी भागात मोठ्या प्रमाणात जिम चा व्यवसाय बाळसे धरू लागला आहे. भोकरदन सारख्या शहरात दोन आधूनिक जिम आहेत. याव्यतिरिक्त संध्याकाळी आणि सकाळी फिरण्यास बाहेर पडणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. थंडीच्या मोसमामध्ये व्यायाम केल्यास तो शरीराला मानतो असं आरोग्यविषयक जाणकार सांगतात. पहाटे मॉर्निंग वॉकला जाणं जिम, व्यायाम शाळा आदि मध्ये जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिम मध्ये जाणं आता नवीन फॅड झाला आहे. मोठ्या संगीताच्या आवाजावर केला जाणारा किंवा एरोबिक्स प्रकारचा इतर व्यायाम तरुण पिढी करत आहे. जिम मध्ये प्रकाशाच्या झगमगाट आणि चारी बाजूने काचेतून दिसणाऱ्या आपल्या प्रतिमा पाहत केला जाणार हा व्यायाम प्रकार शहरी करना बरोबरच ग्रामीण भागात ही दिसू लागला आहे.
: आपल्या आरोग्याच्या बाबतीत महिला अधिक जागृत दिसून येत आहेत मॉर्निंगच्या दरम्यान सर्वच वयोगटातील महिलांची संख्या लक्षणीय आहे. सर्वात कमी खर्चाचा आणि मोकळ्या शुद्ध हवेतील चालण्या फिरण्याचा व्यायाम प्रकार सर्वाधिक लोकप्रिय दिसून येत आहे. <span;>परंपरागत व्यायाम प्रकाराला छेद देत खर्चीक असा जिम प्रकार शहरी भागात वाढत आहे. या अत्याधुनिक व्यायाम प्रकारामुळे व्यायाम शाळा आणि गुरु-शिष्य परंपरा खंडीत होत आहे. अमक्या वस्तादाच्या तालमीत तयार झालो असं म्हणण्याऐवजी, या जिम चा सभासद असा नवीन शब्द प्रकार रुढ होतो आहे.