कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी


कापूस आंदोलनातील नेते गेले कुठे?

भोकरदन :  कापसाची दरवाढ न झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊन उसनवारी किंवा खासगी कर्ज काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे कापसाच्या भाववाढीसाठी आंदोलन करणारे नेते आता गेले कुठे, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
दर कमी मिळत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. दुसरीकडे सद्यस्थितीत आरक्षणाच्या नावावर राज्यभरात विविध संघटनांचे मोर्चे निघत आहेत; परंतु या मोर्चामुळे शासनाचेही शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. परिसरातील बाजारपेठेमध्ये व व्यापारी वर्गही वाटेल त्या भावाने कापसाची खरेदी करीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव पडल्यामुळे कापसाचा भाव आणखी कमी होऊ शकतो, अशी भीती दाखवून व्यापारी शेतकऱ्यांना कापूस विकण्यासाठी मजबूर करीत असल्याचेही चित्र आहे. त्यामुळे ‘भाव आणखी कमी होईल, या भीतीने घरात साठवलेला कापूस कमी भावात विकून शेतकरी मोकळे होत आहे. मागील वर्षी सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते.
त्यावेळीसुद्धा उगवत्या पिकाची माती झाली होती, पण यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे काही परिसरात दोन-तीन वेचणीमध्येच कपाशीची उलंगवाडी होत आहे. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांची अतिशय दयनीय परिस्थिती आहे. त्याचबरोबर बागायती शेतीमध्ये कापसाचे उत्पन्न कमी होत असल्यामुळे लावलेला खर्चही शेतकऱ्यांना भरून काढता येत नाही.
एकरी पाच क्विंटल च्या जवळपास कापूस होण्याची शक्यता आहे. खर्च पाहिला तर एका एकराला ३० ते ३२ हजार रुपये खर्च येतो आणि बेचणीचा खर्च वेगळा आहे. त्यामुळे लावलेला खर्च वजा करता सरासरी उत्त्पन्न होते; मात्र<span;>शेतकऱ्यांनी केलेल्या परिश्रमाचे फळ शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे किमान १० ते १५ हजार रुपये कापसाला क्विंटलप्रमाणे भाव असावा, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

Advertisement

: कापूस, सोयाबीनला भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्याने लावलेला खर्चही भरून निघत नाही. सावकाराच्या दारात गेल्याशिवाय रब्बी पिकाची पेरणी करता येत नाही. या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. त्यामुळे शेतकऱ्यांना जगवायचे असेल, तर कापसासारख्या नगदी पिकाला १० ते १५ हजार रुपयांपर्यंत भाव देणे गरजेचे आहे.

–  सुनील पिसे, शेतकरी, विरेगाव


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »