दानापुर येथील बोगस कामांची पंचायत समितीकडून चौकशी
शेख जफर यांनी केली होती बोगस कामाची तक्रार
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील दानापुर येथे मागच्या तीन महिन्यापूर्वी दलित वस्तीच्या नावावर आमदार निधी मधून ५ लक्ष रुपयांचे काम करण्यात आले होते. ते काम दलीत वस्तीत टाकने बंधनकारक असतांना ते इतर ठिकाणी टाकण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवकाने नियमबाह्य काम करून गैरव्यवहार केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते शेख जफर यांनी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. या अनुषंगाने बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सोमवारी सदरील कामाची चौकशी केली आहे.
दानापूर येथे बहुसंख्य दलित बांधव राहत असताना ती वस्ती सोडून तीन दलित बांधव असलेल्या अशा ठिकाणी हे पाच लाख रुपयांचे काम ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता करण्यात आले. सरपंच व ग्रामसेवक यांनी कोऱ्या पोर्सेडिंग मासिक रजिस्टर वर सदस्यांच्या सह्या घेऊन त्यामध्ये साठेनगर म्हणून चुकीच्या पद्धतीने नोंद केल्याचा आरोप देखील तक्रार करणाऱ्या सदस्यांनी केला आहे. सिमेंट रस्त्याचे काम अंत्यत निकृष्ट दर्जाचे झाले आहे.
सामाजिक कार्यकर्ते शेख जफर यांनी तक्रार देऊन दोन महीने उलटले तरी चौकशी झाली नव्हती. मात्र सोमवारी २० नोव्हेंबर रोजी विस्तार अधिकारी ए. ई. गायकवा व बांधकाम विभागाचे अभियंता शेजूळ व शेळके यांच्या पथकाने ने प्रत्यक्ष काम करण्यात आलेल्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी ग्रामसेवक एस. डी. बावस्कर यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करुन बहुसंख्याने दलित बांधव राहत असलेले नमुना नंबर ८ चे उतारे न देता केवळ तीन घरे असलेल्या घरांची उतारे देण्यात आल्याचा आरोप शेख जफर यांनी केला आहे.
: दानापुर येथील तक्रार झालेल्या कामांची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन चौकशी केलेली आहे. सदरील कामाचा पंचनामा केला असून त्याचा अहवाल वरिष्ठांना लवकरच सादर करण्यात येईल.
– ए. ई. गायकवाड, चौकशी अधिकारी, पंचयात समीती भोकरदन